ऐ गझल..


मी तुला वाचून घडलो ऐ गझल ;
मी तुझ्या प्रेमात पडलो ऐ गझल..
छिद्र का तू भावनेला पाडले ?
केवढा मी आज रडलो ऐ गझल..
मी तसा भित्राच होतो.आज पण-
तू सवे येताच लढलो ऐ गझल..
बोललो मी सत्य जेव्हाही इथे ;
बघ व्यवस्थेलाच नडलो ऐ गझल..
स्वच्छ झाला ,स्पष्ट झाला बोध अन ;
मी कुठे नाहीच अडलो ऐ गझल..
मी रसीकांच्या मनातिल बोललो ;
नम्रतेने उंच चढलो ऐ गझल..