काळजाला काळजीचा शाप आहे
वेदनेचे ते बिचारे माप आहे
धावतो आहे युगांच्या रानवाटा
जन्म हा त्या धावण्याची धाप आहे
वेदनेचे ते बिचारे माप आहे
धावतो आहे युगांच्या रानवाटा
जन्म हा त्या धावण्याची धाप आहे
या नव्या देहातही असतो जुना मी
प्रेम करण्याचा गुन्हा करतो पुन्हा मी
मी मीरेची एकतारी छेडताना
"ते" म्हणाले प्रेम येथे पाप आहे
प्रेम करण्याचा गुन्हा करतो पुन्हा मी
मी मीरेची एकतारी छेडताना
"ते" म्हणाले प्रेम येथे पाप आहे
शक्तीचा या युक्तीचा व्यापार येथे
माणसाची रोज होते हार येथे
दांभिकांच्या दिंडीला पाहून घेता
देवही बोले कसा हा ताप आहे
माणसाची रोज होते हार येथे
दांभिकांच्या दिंडीला पाहून घेता
देवही बोले कसा हा ताप आहे
काळजाला काळजीचा...................
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा