मित्र म्हणून ...
मित्र म्हणून ,
मला तुला जपायला हवे ..
तुझ्या काहिलीच्या उन्हात ..
भरल्या आभाळासारखे ;
धुव्वाधार कोसळून...
कळ्याफुलांनी गालात हसून ..
तर कधी
शुन्य आकाशाचे ;
मौन पांघरून ...
मला तुला जपायला हवे ;
मित्र म्हणून
-कमलाकर देसले
मित्र म्हणून ,
मला तुला जपायला हवे ..
तुझ्या काहिलीच्या उन्हात ..
भरल्या आभाळासारखे ;
धुव्वाधार कोसळून...
कळ्याफुलांनी गालात हसून ..
तर कधी
शुन्य आकाशाचे ;
मौन पांघरून ...
मला तुला जपायला हवे ;
मित्र म्हणून
-कमलाकर देसले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा