संपदा


जीवघेणी ही तुझी आहे अदा ;
जीव मी ओवाळला हा सर्वदा ..

तू अता आहे तिथे होवो सुखी ;
प्रेम तू मजला दिले हा फायदा ..

कौरवांच्या भ्रष्ट हाती अर्जुना-
द्रौपदीला का बरे देतो सदा ..

राम हा सत्तेत यावा म्हणुन ही-
मारुतीची चालवा आता गदा ..

मोडण्यासाठीच केला का बरे -
मोठमोठ्यांनीच येथे वायदा ..

सिद्ध केले रोज मोठ्यांनी इथे;
तोडण्यासाठीच असतो कायदा..

धावला दु:खात अपुल्या जो कुणी-
तेवढी अपुली खरी बघ संपदा ..


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: