जखम आजही ताजी आहे
मीच जिंकली बाजी आहे ..
भरत चालली पापे त्यांची
लोक क्षोभ आवाजी आहे...
लोकशाहिला छळाला जो जो-
तोच आज बघ माजी आहे ...
हार होतसे हिटलरचीही;
तिथे कोण हा पाजी आहे ...
फुकट पाहिजे सत्ता त्यांना -
काय वाटली भाजी आहे ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा