मुक्त आकाश...


गरज बरस रे पावसा रोखुन सगळा श्वास
कळले ना तुज सांग कसे भिजते ना आकाश
क्रोधाने रवी बोलला भस्म करीन अवकाश
तो तर जळतो आजही जळले ना आकाश
धुळ बोलली करीन मी चारित्र्याचा र्‍हास
धुळ धुळीला मिळली पण मळले ना आकाश 


वारा गर्वाने म्हणे मोडीन मीच मिजास
घडी जरा ना मोडली जैसे थे आकाश
कसले सार्‍यांनी पुन्हा आरोपाचे पाश
र्‍ह्दयी सर्वांच्या जरी मुक्त तरी आकाश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: