हे खरेच जगणे....


हे खरेच जगणे अवघड झाले आता
सोन्याचा होता धूर नको त्या बाता
तो धूर आजही आहे, त्या महालात
गोवऱ्या चुलींना इथे पारख्या आता
त्या तिथे उंची पेये पाण्याजागी
डोळ्यातील येथे अश्रू आतले आता

एकास एकसे कपडे आलामारीत
ऋतू साहून फाटे इथे कातडी आता 


सिग्नल ढेकरांचा ते देती रोज
रोजा येथे हा आयुष्याचा आता


इवल्या दुखण्याला रडे रुदाली तेथे
सरणाला येथे कुणी वाली न आता

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: