हे का इतके सोपे आहे ?


हे का इतके सोपे आहे ;
सोसण्याचा सूर होणे ?
सागरातही मातीचे -
घर शाबूत राहणे ?
असा पेटून उठतो -
पूर्व पश्चिमेला रोज ;
निखार्‍याचा अंगलेप -
कसा चंदनी सांगणे ?
जेथे दीड फुट खांदा -
आणि शत फूट ओझे ;
फक्त एकच हृदय -
आणि शेकडो दुखणे ...
झाले तर असे व्हावे -
माती भिजावी भाजावी ;
घट्ट होणे वितळणे ;
व्हावे दु:खच देखणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: