भाग पाडशी मनातले तू बोलायाला ;
गुपीत सगळे मनातलेही सांगायला ...
ओलेत्या केसांचा सांगू गंध असा की ,
समाधीतला सुगंध आला भेटायला ...
विश्वामित्रा विरघळला रे बर्फ तपाचा ;
पहा शमाची शाल लागली उसवायाला ...
गळून पडली कशी जपाची माळ बरे ही !
तुझ्या रुपाचा धूप लागला पसरायाला ...
तिखटावरती तेलच नाही मिळे त्यास. मग -
साजुक तुपही अवघड जाते पचवायाला ...
प्रेमालाही इथे नितीचे नियम लागले ;
घुसमट होते मनातले मग मांडायाला...
किती निरागस थेट बोलते प्रेमाचे , पण -
कोरा कागद शीक अता तू वाचायाला ..
त्याग हीच प्रेमाची आहे ओळख राणी ;
जमायला तुज हवे मलाही सोडायाला...
दोनपणा अन दुरावाच तर पिकतो येथे ;
भाग्य लागते अद्वैताला वाचायाला ...
गुपीत सगळे मनातलेही सांगायला ...
ओलेत्या केसांचा सांगू गंध असा की ,
समाधीतला सुगंध आला भेटायला ...
विश्वामित्रा विरघळला रे बर्फ तपाचा ;
पहा शमाची शाल लागली उसवायाला ...
गळून पडली कशी जपाची माळ बरे ही !
तुझ्या रुपाचा धूप लागला पसरायाला ...
तिखटावरती तेलच नाही मिळे त्यास. मग -
साजुक तुपही अवघड जाते पचवायाला ...
प्रेमालाही इथे नितीचे नियम लागले ;
घुसमट होते मनातले मग मांडायाला...
किती निरागस थेट बोलते प्रेमाचे , पण -
कोरा कागद शीक अता तू वाचायाला ..
त्याग हीच प्रेमाची आहे ओळख राणी ;
जमायला तुज हवे मलाही सोडायाला...
दोनपणा अन दुरावाच तर पिकतो येथे ;
भाग्य लागते अद्वैताला वाचायाला ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा