तूच एक माझा l

तूच एक माझा l 
आहे जीवलग l 
बाकी सारी धग l 
पोळणारी ll 

तुझ्या स्मरणाचा l 
केवढा आधार l 
बाकी निराधार l 
करणारे ll 

प्रसन्न करते l
तुझी आठवण l
थांबे वणवण l
मनातली ll

श्वासाची पालखी l
सजविली. त्यात l
रहा दिनरात l
माझासवे ll 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: