पायाशीच ठेवा ...

पेलवेना मज l 
मोठेपण देवा l 
पायाशीच ठेवा l 
लेकराला ll

तुझे राहण्यात l 
लाभते जे सुख l 
बाकी सारे दु:ख l 
परिचित ll

कौतुकाचे सुख l
नैराश्याचे मूळ l
त्याची मळमळ l
वाढू नेदी ll 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: