तुझं येणं ..
आभाळभर अंधाराला पुसणार्या
सूर्यासारखं ..
आठा महिन्याच्या प्रतिक्षेनंतर
अचानक भरून येणार्या आभाळासारखं
गच्च भरून येणं ..
तुझं येणं ..
दिवसभर ऑफिसमध्ये कागदाशी कुस्त्या खेळून ;
थकलेल्या बापानं घरी पोहोचावं ..
नि अंगणातून "बाबा" म्हणत
अपार असोशीनं पायांना बिलगण्यासाठी ..
धावणार्या बाळासारखं ..फक्त निरागस ..
तुझं येणं ..
फांदीवर काल कुठेच नसलेल्या कळीसारखं
अचानक आमंत्रणाशिवाय फुलाला भेटणार्या ;
फुलपाखरासारखं.. निर्हेतूक..
तुझं येणं ..
उन्हातान्हात अपार कष्टानं
अंगभर घामाच्या धारा वाहातांना येणार्या ;
वार्याच्या मंद झुळुकीसारखं
पोटात जशी पेटते भूक ... नि
ओठाला लागावी तहान
तसं तुझं येणं ..
तुझं जाणं
जीवघेणं..
आभाळभर अंधाराला पुसणार्या
सूर्यासारखं ..
आठा महिन्याच्या प्रतिक्षेनंतर
अचानक भरून येणार्या आभाळासारखं
गच्च भरून येणं ..
तुझं येणं ..
दिवसभर ऑफिसमध्ये कागदाशी कुस्त्या खेळून ;
थकलेल्या बापानं घरी पोहोचावं ..
नि अंगणातून "बाबा" म्हणत
अपार असोशीनं पायांना बिलगण्यासाठी ..
धावणार्या बाळासारखं ..फक्त निरागस ..
तुझं येणं ..
फांदीवर काल कुठेच नसलेल्या कळीसारखं
अचानक आमंत्रणाशिवाय फुलाला भेटणार्या ;
फुलपाखरासारखं.. निर्हेतूक..
तुझं येणं ..
उन्हातान्हात अपार कष्टानं
अंगभर घामाच्या धारा वाहातांना येणार्या ;
वार्याच्या मंद झुळुकीसारखं
पोटात जशी पेटते भूक ... नि
ओठाला लागावी तहान
तसं तुझं येणं ..
तुझं जाणं
जीवघेणं..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा