काळजातुन काळजाचे गात असतो ;
आपला स्वर त्याचिया गाण्यात असतो..
मी तुझ्याशी बोलतांना , ऐकतांना ;
फक्त आणी फक्त आनंदात असतो...
सर्व असुनी तूच नसते सोबतीला -
त्या क्षणी मी एकटा दु:खात असतो..
सोबतीचा अर्थ माझा ऐक मित्रा ;
तीच माझ्या मी तिच्या हृदयात असतो ..
प्रेम करणाराच येथे सर्वकाळी ;
या जगाच्या रोजच्या वादात असतो..
रिक्त होणे हीच ओळख या नभाची ;
मेघ देण्याच्या किती नादात असतो..
का बरे शोधायचे त्या ईश्वराला ?
तो तुझ्या रूपातही साक्षात असतो ..
बावरी राधाच ती, मीरा दिवानी ;
प्रेमाळांच्या सावळा पक्षात असतो..
आपला स्वर त्याचिया गाण्यात असतो..
मी तुझ्याशी बोलतांना , ऐकतांना ;
फक्त आणी फक्त आनंदात असतो...
सर्व असुनी तूच नसते सोबतीला -
त्या क्षणी मी एकटा दु:खात असतो..
सोबतीचा अर्थ माझा ऐक मित्रा ;
तीच माझ्या मी तिच्या हृदयात असतो ..
प्रेम करणाराच येथे सर्वकाळी ;
या जगाच्या रोजच्या वादात असतो..
रिक्त होणे हीच ओळख या नभाची ;
मेघ देण्याच्या किती नादात असतो..
का बरे शोधायचे त्या ईश्वराला ?
तो तुझ्या रूपातही साक्षात असतो ..
बावरी राधाच ती, मीरा दिवानी ;
प्रेमाळांच्या सावळा पक्षात असतो..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा