तुझ्यामधे मी किती हरवलो !
नाव विसरलो , गाव विसरलो....
कळले सुद्धा नाही ; केव्हा -
तुझाच प्रियकर होवुन बसलो ..
हवे वाटले असेल तुजला ;
हृदय म्हणुन तर देवुन चुकलो ..
नाजुक साजुक मुळे बिलगता ;
कातळ असुनी मी पाझरलो ...
फकीरसुद्धा तुला भावला ;
तुझ्यामुळे तर अमीर बनलो...
ईश्वर मजला तुझ्यात दिसला ;
तुला पाहुनी किती हरखलो ..
निराधार या नभास सोडुन ;
मी मातीच्या कुशीत शिरलो ..
कबूल करतो खुलेआम की ;
तुझ्यामुळे मी मज आवडलो...
नाव विसरलो , गाव विसरलो....
कळले सुद्धा नाही ; केव्हा -
तुझाच प्रियकर होवुन बसलो ..
हवे वाटले असेल तुजला ;
हृदय म्हणुन तर देवुन चुकलो ..
नाजुक साजुक मुळे बिलगता ;
कातळ असुनी मी पाझरलो ...
फकीरसुद्धा तुला भावला ;
तुझ्यामुळे तर अमीर बनलो...
ईश्वर मजला तुझ्यात दिसला ;
तुला पाहुनी किती हरखलो ..
निराधार या नभास सोडुन ;
मी मातीच्या कुशीत शिरलो ..
कबूल करतो खुलेआम की ;
तुझ्यामुळे मी मज आवडलो...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा