नवी सुरुवात ...


मनाची धावही सरली ;
तुझ्या मौनात मावळली ..

रिती होताच ओठाला -
कन्हैया लावतो मुरली ..

धरेला भाळुनी कैसी ?
नभाने शीळ वाजवली ..

सुखाने तर ..सुखाची ही -
नशा तृष्णाच वाढवली ..

कथेच्या शेवटाला मज-
नवी सुरुवात सापडली ..

सुखाची फाटकी थैली ;
शहाण्यांची कुठे भरली ?

स्मशानी शोधली आणिक-
भुते गावात आढळली .. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: